पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला जाळून ठार केल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. घोटकी जिल्ह्य़ातील धक्री शहरात ही घटना घडली. चरितार्थासाठी पीडित मुलगी आपल्या आईसोबत शिवणकाम करत होती. त्यांनी तयार केलेली बेडशिट विकत घेण्याच्या उद्देशाने तीन नराधमांनी या मुलीचा पाठलाग केला. या मुलीवर अत्याचार करून तिला पेटवून दिले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने या मुलीच्या भावाने घोटकी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळली असून अपराध्यांना कडक शासन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.