30 November 2020

News Flash

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू, २५ जखमी

घराबाहेर आपल्या शेतांमध्ये काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने यातील बहुतांश जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा प्रकार घडल्याचे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

अंगावर वीज कोसळून मृत पावलेल्या १३ जणांपैकी ३ जण नादीया, मुर्शिदाबाद आणि नॉर्थ २४ परगाना जिल्ह्यातील आहेत. तर दक्षिण दीनाजपूर आणि मालदा जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

घराबाहेर आपल्या शेतांमध्ये काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने यातील बहुतांश जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या मोठ्या पावसाची स्थिती अूसन ढगांच्या मोठ्या गडगडाटांसह वीज कोसळण्याच्या अनेक घटना विविध भागात घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

पुरुलिया जिल्ह्यात वीज कोसळून जखमी झालेल्या ४ जणांपैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. अचानक निर्माण झालेल्या या वातावरणातील बदलामुळे राज्यातील अनेक भागात अॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हवामान खात्याकडून मोठ्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 5:32 pm

Web Title: 13 killed 25 injured in lightning strikes in west bangal
Next Stories
1 FB बुलेटीन: पुण्यात हॉटेलमध्ये घुसली कार, गुजरातमध्ये ३०० दलितांचं धर्मांतर आणि अन्य बातम्या
2 खतरनाक दहशतवादी समीर टायगर आणि अकीब खानचा भारतीय लष्कराने केला खात्मा
3 दुबईच्या फरार राजकन्येला मोदी सरकारनं पकडून दिलं वडिलांच्या ताब्यात?
Just Now!
X