ट्रान्सजेंडर समाजासाठी एक खूशखबर आहे. छत्तीसगड सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलत असून पोलीस दलात लवकरच ट्रान्सजेंडर्सची भरती करणार आहे. ट्रान्सजेंडर्सची योग्यता आणि समानतेच्या आधारावर नियुक्त केली जाईल. छत्तीसगडमध्ये सध्या ३ हजारांहून अधिक ट्रान्सजेंडर्स आहेत. यामुळे ट्रान्सजेंडर्सला समानतेचा हक्क देणे आणि त्यांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ट्रान्सजेंडर्सला पोलीस दलात सहभागी करून घेतले जाईल, अशी घोषणा छत्तीसगड सरकारने नुकतीच केली होती. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. जाहिरातीनुसार ४० ट्रान्सजेंडर्सनी अर्ज दिला आहे. हे अर्ज तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या जाहिरातीनुसार, छत्तीसगड पोलिस विविध श्रेणीत कॉन्स्टेबलच्या २२५४ पदे भरणार आहेत. पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडर्सचा अर्ज सुलभ करणे आणि त्यांना सुविधा देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. लेखी आणि शारीरिक क्षमता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.