News Flash

पाच दहशतवाद्यांना रशियन सैन्याकडून कंठस्नान

दागेस्तान प्रांतातील विशेष कारवाईत रशियन सैन्याने पाच संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या कारवाईत एका रशियन जवानास वीरमरण आले.

| March 27, 2014 06:01 am

दागेस्तान प्रांतातील विशेष कारवाईत रशियन सैन्याने पाच संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या कारवाईत एका रशियन जवानास वीरमरण आले.
या दहशतवाद्यांमध्ये, अझरबैजानचा नागरिक असलेल्या तुरल अतायेव्ह या कुख्यात स्थानिक अतिरेक्याचा समावेश आहे. दागेस्तान प्रांतातील एका गावात काही अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती रशियाच्या दहशतवादविरोधी पथकास मिळाली.
  त्या अतिरेक्यांनी शरण यावे म्हणून सैन्याने प्रयत्न केले, मात्र अतिरेक्यांनी सैनिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. अखेर प्रत्युत्तरादाखल लष्कराने गोळीबार केला. त्यामध्ये पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:01 am

Web Title: 5 terrorists eliminated by russian forces
Next Stories
1 मोदींच्या बिहारमधील सभेत गोंधळ; पोलिसांकडून लाठीमार
2 सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी १० हजार कोटी एकरकमी भरणे अशक्य- सहारा
3 काँग्रेसने जाहीरनाम्याची पवित्रताच ठेवली नाही- नरेंद्र मोदी
Just Now!
X