देशातील ५५६६९ खेडी अजून मोबाईल दूरध्वनी सेवेपासून वंचित आहेत असे सरकारने आज लोकसभेत सांगितले. दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण व शहरी मोबाईल सेवा क्षमता सप्टेंबर अखेर ४८.७९ टक्के व १५२.३६ टक्के आहे. ५९७६०८ खेडय़ांपैकी ५४१९३९ खेडी अजून मोबाईल सेवेत समाविष्ट आहेत अजून ५५६६९ खेडय़ात मोबाईल सेवा पोहोचलेली नाही म्हणजे ९.३१ टक्के भाग मोबाईल सेवेत नाही.
मोबाईल दूरसंचार सेवा सगळ्या खेडय़ात पोहोचवण्याचा आमचा विचार आहे असे सांगून प्रसाद म्हणाले की, ही सेवा किमतीच्या दृष्टीने संवेदनशील आहे.