11 December 2017

News Flash

नेपाळमध्ये बस अपघातात ६ जण ठार

त्या वेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने घोदाहाच्या जंगलात ती अपघातग्रस्त झाली.

काठमांडू | Updated: January 4, 2016 2:01 AM

नेपाळच्या दक्षिणेकडील भारतीय सीमेलगत असलेल्या रूपनदेही जिल्ह्य़ात भरधाव बस उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले, तर १६ जण जखमी झाले. महामार्गालगतच्या जंगलात बस दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती रविवारी प्रसारमाध्यमांनी दिली.
अपघातातील चार लोकांचा घटनास्थळावरच, तर दोघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बुतवालचे पोलीस उपअधीक्षक महेंद्र खडका यांनी दिल्याचे वृत्त ‘माय रिपब्लिका’ने दिले आहे.
ही बस रूपनदेही जिल्ह्य़ातील नारायणघाटकडून नेपालगंजकडे जात होती. त्या वेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने घोदाहाच्या जंगलात ती अपघातग्रस्त झाली.

First Published on January 4, 2016 12:02 am

Web Title: 6 killed in bus accident at nepal
टॅग Bus Accident