25 February 2021

News Flash

अमेरिकेच्या ‘एच १ बी’व्हिसासाठी ६५ हजार अर्ज

परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते.

अमेरिकी काँग्रेसने एच १ बी व्हिसासाठी ठरवून दिलेल्या ६५ हजारांच्या मर्यादेइतके अर्ज दाखल झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे.  २०२० या वर्षांसाठी हे अर्ज असून भारतीय व्यावसायिकांसह इतर देशांच्या लोकांचेही अर्ज आले आहेत.

एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांची सैद्धांतिक व तांत्रिक निपुणता हा महत्त्वाचा निकष मानला जातो. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसामार्फत देशात येणाऱ्या कु शल कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात. भारत व चीन या दोन देशांचे कर्मचारी यात सर्वाधिक प्रमाणात असतात. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे की, एच १बी व्हिसासाठी ६५ हजारांची अर्ज मर्यादा असली तरी २०२० या आर्थिक वर्षांसाठी पुरेसे अर्ज आलेले आहेत. हे वर्ष १ ऑक्टोबर २०१९ पासून सुरू होणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर विभागाने १ एप्रिलपासून अर्ज मागवले होते. एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसात नेमके किती अर्ज प्राप्त झाले याची माहिती  या सेवा विभागाने अजून दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 2:34 am

Web Title: 65 thousand applications for h1b visa
Next Stories
1 शत्रुघ्न सिन्हा अधिकृतपणे काँग्रेसमध्ये
2 मुंबईतल्या शोभायात्रांना राजकीय रंग, लोकसभेच्या उमेदवारांकडून प्रचार
3 मोदींना कुटुंबाचा अनुभव नाही!
Just Now!
X