भारतात २००९ ते २०११ पर्यंत एकूण ६८००० बलात्काराच्या गुन्हांची नोंद आहे. पण आतापर्यंत फक्त १६००० गुन्ह्यांत नराधमांना दोषी ठरविण्यात आल्याचे समजते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार, भारतात २०११ या वर्षात २४,२०६ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्यातील फक्त ५,७२४ जण दोषी ठरविण्यात आले आहेत. उरलेल्या गुन्ह्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. त्याचप्रमाणे २०१० साली एकूण २२,१७२ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्यातील केवळ ५,६३२ गुन्ह्यांतील नराधमांना दोषी ठरवण्यात आले आहे. राज्याप्रमाणे ही आकडेवारी पाहिल्यास ,मध्यप्रदेशात २००९ ते २०११ सालापर्यंत एकूण ९५२९ बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत त्यातील फक्त २९८६ गुन्ह्यांतील नराधमांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये याच कालवधीत एकूण ७,०१० बलात्काराचे गुन्हे आणि फक्त ३८१ जण दोषी. उत्तरप्रदेशची स्थिती काही वेगळी नाही एकूण ५,३६४ बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी केवळ ३८१६ नराधमांना आत्तापर्यंत दोषी ठरविण्यात आले आहे.