04 December 2020

News Flash

माहेरी गेलेल्या पत्नीचा प्रियकर असल्याचं कळताच आधी प्रियकराची हत्या केली; नंतर…

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

प्रातिनिधिक

पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असणाऱ्या व्यक्तीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीत रविवारी रात्री हा प्रकार घडला. एका महिन्यापूर्वी पत्नी मुलांसोबत घर सोडून माहेरी गेली होती. तेव्हापासून ही व्यक्ती मानसिक तणावात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रविवारी शहल आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. तेथून घरी परतत असतानाच एका २५ वर्षीय इमरानने त्याला सोबत दिली. यावेळी इमरानचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शहलला झाला. यानंतर दुसऱ्याच रात्री शहलच्या घरात इमरानचा मृतदेह सापडला.

शहलच्या घऱात रात्री कोणीतरी ओरडल्याचा आवाज झाला. शहलच्या आई पळत त्याच्या खोलीकडे गेली असताना इमरान बेशुद्ध अवस्थेत आढळला. विचारलं असता त्याने आपण हत्या केल्याचं म्हटलं. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई आणि भावालाही शहलने मारहाण केला. आपला बचाव करण्यासाठी दोघे खाली पळाले असता शहलने गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा- पती घरात पुतणीची हत्या करत असताना पत्नी घराबाहेर देत होती पहारा, धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले

“शहलच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहलची आई आणि भाऊ जखमी झाले आहेत. शहलच्या हिंसक वृत्ती आणि मानसिक स्थितीची शेजाऱ्यांना कल्पना होती,” असं पोलिसांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 10:32 am

Web Title: a man commit suicide after killing wife lover in delhi sgy 87
Next Stories
1 राखी बांधण्याच्या अटीवर जामीन प्रकरण : “न्यायाधीशांना लैंगिक संवेदनशीलतेचे धडे दिले पाहिजेत”
2 मोदींपाठोपाठ आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना शिवसेनेचाही जाहीर पाठिंबा
3 देशभरात २४ तासांत ५८ हजारांपेक्षा अधिक जण करोनामुक्त; ३८ हजार ३१० नवे करोनाबाधित
Just Now!
X