27 September 2020

News Flash

स्पॅनिश महिलेवर बलात्कार, नराधम अटकेत

पोलिसांनी याप्रकरणी नराधमाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे

संग्रहित छायाचित्र

हरयाणातल्या गुरूग्राम या ठिकाणी शुक्रवारी रात्री एका स्पॅनिश महिलेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातल्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्याने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार  स्पॅनिश महिलेने केली आहे. पीडित तरूणी ही वर्षभराच्या इंटर्नशीपसाठी आली आहे. गुरूग्राम येथील एका आयटी कंपनीही ही युवती इंटर्नशीप करते आहे.  पोलिसांनी या प्रकरणी नराधमाला अटक केली आहे.

या सगळ्या प्रकराबाबत अटक करण्यात आलेल्या नराधमाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी डीएलएफ फेज १ च्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पीडित युवती एका पार्टीसाठी गेली होती. त्यानंतर एका प्रॉडक्शन हाऊसच्या असिस्टंट मॅनेजरने माझ्यावर बलात्कार केला असे या पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 5:53 pm

Web Title: a spanish national was allegedly raped by a man last night police have arrested the accused in the case further investigation underway scj 81
Next Stories
1 भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे मोठे आव्हान : पंतप्रधान
2 रेल्वेत ‘ती’ सेवा नको, सुमित्रा महाजन यांच्या पत्रात रेल्वेमंत्र्याविरोधात नाराजीचा सूर
3 मेट्रोसाठी आता देशभरात ‘वन मेट्रो वन कार्ड’
Just Now!
X