28 January 2021

News Flash

…म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने ‘त्या’ मुस्लीम धर्मगुरुचे नागरिकत्व घेतलं काढून

ऑस्ट्रेलियात राहूनही नागरिकत्व काढून घेतलेली पहिलीच व्यक्ती

फोटो सौजन्य : ABC न्यूज

ऑस्ट्रेलियाने अल्जेरियामधील एका मुस्लीम धर्मगुरुचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्मगुरुने २००५ साली मेलबर्नमधील एका फुटबॉल सामन्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी स्फोट घडवून आणणाऱ्या गटाचे नेतृत्व केल्याप्रकरणी धर्मगुरुला दोषी ठरवण्यात आलं आहे. अब्दुल नसीर बेनब्रीका असं या व्यक्तीचं नाव आहे. ऑस्ट्रेलियात राहूनही देशाने नागरिकत्व काढून घेतलेला नसीर हा पहिलाच व्यक्ती ठरला आहे. यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिलं आहे सामान्यपणे एखाद्या व्यक्तीकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे सिद्ध होते तेव्हाच ऑस्ट्रेलियामध्ये नागरिकत्व रद्द करण्याचा कायदा आहे.

देशाचे गृहमंत्री पीटर डटन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीपासून देशाला दहशतवादी धोका असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. नसीरविरोधात दहशतवादाची तीन प्रकरणं होती. दहशतवादी संघटना चालवणे, दहशतवादी संघटनेचा भाग असणं आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखणे या प्रकरणामध्ये नसीरला दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये नसीरला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही खटला सुरु असल्याने त्याला तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे. देशातील दहशतवादी कायद्यानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही व्यक्तीला पुढील तीन वर्षांसाठी तुरुंगामध्ये ठेवता येते. नसीरच्या वकीलांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचा व्हिसा रद्द करुन त्याला अल्जीरियाला पाठवण्याच्या निर्णयाविरोधात अर्ज करण्यासाठी ९० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 4:55 pm

Web Title: abdul nacer benbrika australia revokes citizenship of terror plotter scsg 91
Next Stories
1 KBC : अनुपा ठरल्या तिसऱ्या करोडपती; ‘या’ प्रश्नाने पालटलं नशीब
2 नाही म्हणजे नाहीच… अदानींना विमानतळाचं कंत्राट देण्यास केरळचा कडाडून विरोध; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
3 मुंबईत कोविड सेंटरमधील रुग्णांची दिवाळी होणार ‘गोड’; चाखता येणार घरचा फराळ
Just Now!
X