आधार कार्ड ही देशातील प्रत्येक नागरीकाची ओळख असून त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मागील काही महिन्यात जवळपास १३ कोटी आधार कार्डांचे क्रमांक बाहेर आले असून त्याच्या सहाय्याने अर्थिक घोटाळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे गुन्हा करणाऱ्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश राज्य सरकार यांच्या वेबसाईटची सुरक्षा अतिशय वाईट असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. एका अहवालानुसार आधारची माहिती अशाप्रकारची माहिती पहिल्यांदाच बाहेर आली असून एकूण ३ वेबसाईटवरुन ही माहिती बाहेर आली असल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तातून समोर आले आहे.

सध्या जवळपास १०.९ कोटी आधार क्रमांक मनरेगाच्या वेबसाईटवर नोंदविले आहेत. यापैकी ७८ लाख पोस्टाच्या खात्यांशी जोडले असून ८.२४ कोटी आधार क्रमांक बॅंक खात्यांशी जोडलेले आहेत. ‘आधार’शिवाय बॅंकखात्याची माहिती आणि पोस्टाच्या खात्याची माहिती, एखाद्या व्यक्तीने किती दिवस काम केले अशी सर्व माहीती यातून समोर येण्याची शक्यता आहे. जवळपास दिड करोड आधार कार्ड जनतेसमोर उघड झाली असून यातील अनेक १५ लाख पोस्टाची खाती आणि बॅंकेचा खाती आधारशी संलग्न आहेत.
त्यामुळे नागरीकांचा आधार असलेले आधार कार्डच धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता सरकार यावर कोणत्या उपाययोजना करणार हा प्रश्न कायम आहे.