News Flash

जिगोलो बनण्याच्या नादात शिक्षकच महिलेच्या जाळयात फसला

शिक्षकाने व्हिडीओ कॉलकरुन तिला आपली नेकेड बॉडी दाखवली.

जिगोलो बनण्याच्या नादात एक आयुर्वेदाचा शिक्षक महिलेच्या सापळयात अडकला. गुजरातच्या अहमदाबाद शहरात ही घटना घडली. हा शिक्षक निकोल येथे रहायला असून फेसबुकवरुन त्याची फिरोझा तैली नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली होती. फिरोझा तैलीने त्याला सेक्ससाठी पैसे देण्यास तयार असलेल्या महिलेबरोबर ओळख घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

एफआयआरनुसार, दीड महिन्यापूर्वी या शिक्षकाला ‘फिरोझा ऑल गुजरात’ या फेसबुक आयडीवरुन एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. प्रोफाईलवर एका सुंदर दिसणाऱ्या महिलेचा फोटो होता. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर पाच दिवसाने फिरोझाने एका सुंदर महिलेचा फोटो पाठवला व जिगोलो सेवा देण्यासाठी तयार रहा असे सांगितले.

“फिरोझाने त्या शिक्षकाला तुला एक अकाऊंट बनवावे लागेल व त्यात फी पोटी साडेसहाहजार ट्रान्सफर करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर फिरोझाने शिक्षकाला नेकेड होऊन दाखवायला सांगितले तसेच वैद्यकीय चाचणीही करायला सांगितली” अशी माहिती पोलिसांनी दिली.

फिरोझाने सांगितल्यानुसार, शिक्षकाने व्हिडीओ कॉलकरुन तिला आपली नेकेड बॉडी दाखवली. त्यानंतर अकाऊंटमध्ये साडेसहाहजार रुपये जमा केले. त्यानंतर फिरोझाने पुन्हा संपर्क साधला व आपल्यावर २० लाखाचे कर्ज असल्याचे त्याला सांगितले. ३० हजार तात्काळ दिले नाहीत तर, सोशल मीडियावर न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पैसे लगेच मिळाले नाहीत तर, पैशांची रक्कम वाढत जाईल असे सुद्धा तिने सांगितले. एफआयनुसार, अखेर फिरोझाने पाच लाखाची मागणी केली. त्या शिक्षकाने वैतागून मी आत्महत्या करीन, असे सांगितले त्यावर तिने मला फरक पडत नाही असे उत्तर दिले. सर्व बाजूंनी हताश झालेला या व्यक्तीने मित्राजवळ आपले मन मोकळे केले. तेव्हा त्याला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला व अखेर त्याने रीतसर एफआयआर नोंदवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 3:12 pm

Web Title: ahmedabad teacher falls into gigolo gig trap gets blackmailed dmp 82
Next Stories
1 अफजल गुरू बळीचा बकरा; सोनी राझदान यांचं वादग्रस्त वक्तव्य
2 जम्मू-काश्मीर: अवंतिपोरा चकमकीत दोन दहशतवादी ठार, दोन सैनिक जखमी
3 पेरियार यांच्याविषयी केलेल्या विधानावरून रजनीकांत यांच्याविरोधात संताप
Just Now!
X