आंध्र प्रदेश सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावाच्या विरोधात १४२ सदस्यांनी मतदान केले असून साध्या बहुमतासाठी केवळ दोन मते कमी पडली असली तरी आपले सरकार अल्पमतात गेल्याची करण्यात आलेली सूचना मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी शनिवारी फेटाळून लावली. सभागृहात शुक्रवारी रात्री आम्ही बहुमत सिद्ध केले आहे, असे रेड्डी यांनी तेलंगणा राष्ट्र समितीने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर पराजय झाला असतानाही स्पष्ट केले. अविष्टद्धr(२२४)वासाच्या ठरावाविरोधात १४२ सदस्यांनी मतदान केले तर केवळ ५८ जणांनी त्याला पाठिंबा दिला. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देशमचे ६४ सदस्य असून ते तटस्थ राहिले, त्यामुळे सरकार तरले.