News Flash

कोल्हापूरच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात रविवारी भारतीय सैन्यदलाचा एक जवान शहीद झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

| May 19, 2014 12:58 pm

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात रविवारी भारतीय सैन्यदलाचा एक जवान शहीद झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना अखनूरमधील पल्लनवाला भागात घडली. वीरमरण आलेला जवान मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. उत्तम ढिकले असे त्यांचे नाव आहे.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता म्हणाले, सैन्यदलाच्या गस्ती पथकांवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबारातच उत्तम ढिकले शहीद झाले. त्यांच्यासोबत विनोद कुमार आणि अनमोल कुमार हेदेखील जखमी झाले आहेत. ढिकले हे मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. तर इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. भुसूरुंग स्फोटात जखमी झालेल्या विनोदकुमार यांच्या सुटकेसाठी उत्तम ढिकले जात होते. त्यावेळी पाकिस्तानी हद्दीतून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. याचवेळी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ढिकले यांना वीरमरण आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 12:58 pm

Web Title: army jawan killed two others injured in firing by pak troops along loc
टॅग : Firing On Loc
Next Stories
1 अंतर्गत सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृह सचिवांकडून मोदींना माहिती
2 काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पहिले पाढे पंचावन्न!
3 मलेशियाचे विमान पाडले गेले?
Just Now!
X