बस तलावात कोसळल्याने सात जण ठार तर २० जण जखमी झाले आहे. आसाम स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची ही बस आहे अशीही माहिती समोर आली आहे. बस चालकाचा बसवरचा ताबा सुटला त्यामुळे ही बस तलावात कोसळली. गुवाहाटी ते मुकलमा दरम्यान ही बस चालली होती. त्याचवेळी चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे ही बस तलावात कोसळली. या घटनेत सातजण ठार झाले आणि २० जण जखमी झाले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.