घरगुती वादातून पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल फेकले. यामध्ये पती ५० टक्के भाजला आहे. बंगळुरुमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पतीचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु आहे, असा पत्नीला संशय होता. त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. त्याच रागातून पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल फेकले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
मंजुनाथ आपली फसवणूक करतोय असा पद्माचा आरोप होता. रविवारी सकाळी याच मुद्दावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात पद्माने मंजुनाथच्या चेहरा आणि छातीवर उकळते तेल फेकले. दोघांच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत.
उकळते तेल अंगावर पडल्यानंतर मंजूनाथचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. भाजलेल्या मंजुनाथला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. मंजुनाथ ५० टक्के भाजला असून, स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 3:02 pm