01 March 2021

News Flash

धक्कादायक ! मित्रांनी खेळताना गुदद्वारात हवा भरल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये गुदद्वारात हवा भरल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली. मित्रांनी खेळताना मुलाच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसर घुसवून हवा भरण्याचा प्रयत्न केल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी मुलाची ओळख पटली असून कान्हा यादव असं त्यांच नाव असल्याचं सांगितलं आहे.

“मुलाचे वडील पालदा इंडस्ट्रियल परिसरात कामाला असून आपल्या कुटुंबासहित त्याच परिसरात राहतात. तपास करताना आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलाच्या मित्रांनी खेळत असताना कॉम्प्रेसरच्या नळीचं तोंड त्याच्या गुदद्वारात टाकून हवा भरण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलाला तात्काळ सरकारी महाराजा यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे मुलाचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. “शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळेल”, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मुलाचे वडील रामचंद्र यादव यांनी सांगितल्यानुसार, त्याचे दोन मित्र त्याला घेऊन घरी आले होते. “त्याचं पोट फुगलं असल्याने मी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. फॅक्टरीत असणारा एअर कॉम्प्रेसर वापरत मित्रांनी त्याच्यात हवा भरण्याचा प्रयत्न केल्याचं नंतर मला कळलं”, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 12:20 pm

Web Title: boy dies after friends pump air into him through his rectum sgy 87
Next Stories
1 कर्नाटक: मुख्यमंत्री येडियुरप्पांनी आवाजी मतदानाने जिंकला विश्वासदर्शक ठराव
2 वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर आझम खान यांनी मागितली माफी
3 ”एक था टायगर” ते ”टायगर जिंदा है” हा व्याघ्रसंवर्धनाचा प्रवास सुखकारक-मोदी
Just Now!
X