भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिसहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका खिशात घातली. अनेक आव्हानांचा सामना करत भारतानं मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला असून, भारतीय संघाचं कौतूक करत अभिनंदन केलं आहे.

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. मालिका विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं.

आणखी वाचा- ‘अजिंक्य’ भारत! ‘गाबा’वर ऑस्ट्रेलियाला लोळवलं; पंत-गिलची दमदार फलंदाजी

“पंतप्रधान मोदी म्हणाले,”पंतप्रधान मोदी म्हणाले,”भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयामुळे आपण खूप खूश आहोत. भारतीय संघाची ऊर्जा आणि विजयाचं वेड दिसून येत होतं. त्याचबरोबर त्यांचा दृढ निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि दृढ संकल्प होता. संघाचं अभिनंदन. भविष्याती प्रयत्नांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असं म्हणत मोदींनी विजयानंतर आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा- मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे

आणखी वाचा- शरद पवारांचे ‘टीम इंडिया’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे.