News Flash

हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून १४ ठार, मृतांमध्ये १३ जवानांचा समावेश

या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरुच आहे

हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी इमारत कोसळून १४ जण ठार झाले आहेत. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. त्यानंतर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जणांची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे. मृतांमध्ये १३ लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे.

 

सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत १७ जवानांची सुटका करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या दुर्घटनेत १२ जवान आणि १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. इतर जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 7:46 am

Web Title: building collapsed in himachal pradesh 6 army 1 civilian casualties reported scj 81
Next Stories
1 तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, इस्रो लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
2 कर्तारपूर मार्गिका करार: मसुद्यावरील ८० टक्के मुद्दय़ांवर सहमती
3 विश्वासदर्शक ठरावाकडे लक्ष!
Just Now!
X