08 March 2021

News Flash

हैदराबादमधील बॉम्बस्फोटांचा चीनकडून निषेध

हैदराबादमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटांचा चीनने निषेध केला असून भारत सरकार आणि स्फोटात बळी गेलेल्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.चीन या बॉम्बहल्ल्यांचा निषेध करीत असून भारत

| February 26, 2013 01:54 am

हैदराबादमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटांचा चीनने निषेध केला असून भारत सरकार आणि स्फोटात बळी गेलेल्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.चीन या बॉम्बहल्ल्यांचा निषेध करीत असून भारत सरकार, भारतीय जनता आणि स्फोटातील बळी गेलेल्यांचे कुटुंबीय तसेच जखमींबद्दल आम्हाला अत्यंत सहानुभूती वाटते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी येथे पत्रकारांना सांगितले. या स्फोटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना आम्ही शोकसंदेश पाठविला असल्याचे ते म्हणाले.हैदराबादमध्ये गेल्या गुरुवारी सायंकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटात १६ जण ठार व १८० जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 1:54 am

Web Title: china condemns hyderabad bomb blasts
टॅग : China
Next Stories
1 टोकियोला ५.७ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
2 मनोरुग्ण पुत्र ठरला मातेचा काळ..
3 ऑस्कर सोहळा : सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘आर्गो’, ‘लाइफ ऑफ पाय’ला चार पुरस्कार
Just Now!
X