लडाखमध्ये दादागिरी करणाऱ्या चीनने पर्वतरांगांमध्ये उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. २०१७ साली डोकलाममध्ये झालेल्या संघर्षापासूनच चीनने उंचावरील युद्ध लढण्यासाठी विशेष शस्त्रास्त्रे सज्ज ठेवली आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

“२०१७ साली डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. ७० पेक्षा जास्त दिवस हा संघर्ष सुरु होता. डोकलाम तणावानंतरच चिनी सैन्याने आपल्या ताफ्यात टाइप १५ टँक, झेड-20 हेलिकॉप्टर आणि जीजे-2 ड्रोन विमानांचा समावेश केला. उंचावरील क्षेत्रात युद्ध झाल्यास चीनला त्याचा फायदा होईल” असे ग्लोबल टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. दोन्ही सैन्यांच्या लष्करी कमांडर्समध्ये स्थानिक पातळीवर आतापर्यंत झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. पाच आणि सहा मे रोजी पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना भिडले होते. दोन्ही बाजूचे सैनिक या हाणामारीत जखमी झाले होते.

आणखी वाचा- ड्रॅगनची मुजोरी, भारतावर दबाव टाकण्यासाठी लडाख सीमेजवळ चीनच्या फायटर विमानांची उड्डाणं

“…अन्यथा आर्थिक परिणाम भोगावे लागतील”, चीनची भारताला धमकी

करोनाच्या पार्श्वभुमीवर चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असून शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेतील संबंध घट्ट होत असल्याचं चित्र आहे. यामुळे चीनने भारताला अमेरिका आणि आपल्यात सुरु असलेल्या शीतयुद्धापासून दूर रहा असा इशाराच भारताला दिला आहे. चीन सरकारचं मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये भारताला सल्ला देत सांगण्यात आलं आहे की, अमेरिका आणि चीनमधील वादात भारत दूर राहिला तर बरं होईल.