17 November 2018

News Flash

चिमुकल्याच्या खेळामुळे १२ जणांचा होरपळून मृत्यू

तीन वर्षांचे बालक सिगारेट पेटवण्याच्या लायटरने खेळत असताना लागलेल्या भीषण आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात दक्षिण चीनच्या एका कारखान्यात घडल्याची

| April 4, 2014 04:11 am

 तीन वर्षांचे बालक सिगारेट पेटवण्याच्या लायटरने खेळत असताना लागलेल्या भीषण आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात दक्षिण चीनच्या एका कारखान्यात घडल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
२६ मार्च रोजी गुआंगडोंग प्रांतात असणाऱ्या एका कपडय़ाच्या कारखान्यात मालकाची तीन वर्षांची मुलगी खेळत असताना तिच्या हाताला सिगारेट पेटवण्याचे लायटर लागले. तिने खेळता खेळता लायटर पेटवले. मात्र खेळताना लायटर खाली पडून तेथील कपडय़ाने पेट घेतला आणि काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत तेथे असणारे १२ जण होरपळून मरण पावले. कारखान्याच्या मालकाने निवासी इमारत कामासाठी वापरली होती.

First Published on April 4, 2014 4:11 am

Web Title: china toddler started fire which killed 12
टॅग South China