News Flash

नवज्योतसिंग सिद्धूसाठी आता कॉंग्रेसची ‘फिल्डिंग’!

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू राजकारणातून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यानंतर आता कॉंग्रेसने त्यांना पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिलंय.

| April 12, 2013 02:01 am

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू राजकारणातून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यानंतर आता कॉंग्रेसने त्यांना पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिलंय. अमृतसर पश्चिममधील कॉंग्रेसचे आमदार राजकुमार वेर्का यांनी सिद्धू यांना कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिलंय. सिद्धू यांचे पक्षात स्वागत करावे, अशी विनंती त्यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेही केलीये.
सिद्धू यांच्या आईने दोनवेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यांचे वडीलही पतियाळा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. मुलांनी आई-वडिलांच्या मार्गावरूनच मार्गक्रमण केले पाहिजे. सिद्धू यांनी भाजपमध्ये जाऊन मोठी चूक केली. त्यामुळेच मी त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे वेर्का यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 2:01 am

Web Title: congress mla writes to rahul gandhi to induct navjot singh sidhu
Next Stories
1 दिल्लीतील सामूहिक बलात्कार : घटनेच्या वेळी तेथे नसल्याचा दोघा आरोपींचा दावा
2 शीखविरोधी दंगल खटला : साक्षीदार खोटे बोलत आहेत -टायटलर
3 २५ वर्षांत अशी घटना पाहिलीच नाही
Just Now!
X