इंडियन एक्सप्रेसचे प्रिन्सिपल फोटोग्राफर रवी कनोजिया यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पालक व तीन बहिणी आहेत. रवी कनोजिया हे झांशी येथे या दुष्काळग्रस्त भागात पाणी नेणाऱ्या रेल्वेगाडीच्या (वॉटर ट्रेन) वार्ताकनासाठी गेले होते.२००९ साली ते नवी दिल्लीला आले.मुझफ्फरनगर दंगलीत विस्थापित झालेल्यांच्या छायाचित्रणाबद्दल त्यांना ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ ने सन्मानित केले होते