News Flash

करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर होतो परिणाम; प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती

जागतिक आरोग्य संघटनेनंही यासंदर्भात पावलं उलचण्याची संशोधकांनी केली मागणी

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : एपी आणि आरईझेड आर्टवरुन साभार)

करोनाचा प्रादुर्भाव होऊन सव्वा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे तरी करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जारी करण्यात आल्याने अनेकांना घरातच कोंडून रहावं लागलं. जगभरातील कोट्यावधी लोकांना करोनाचा संसर्ग झाला. तसेच करोनामधून सावरलेल्यांना या विषाणुच्या संसर्गाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. करोनासंदर्भात जगभरामध्ये अजून संशोधन सुरु आहे. अशाच एका संशोधनामध्ये अभ्यासकांना एक धक्कादायक गोष्ट दिसून आली आहे. करोनाचा संसर्गाचा परिणाम पुरुषांच्या लैंगिकतेवर होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. करोनाची बाधा झालेल्यास पुरुषांमधील शुक्राणूंचा दर्जा खालावतो असं संशोधकांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सेक्स करताना झाला त्याचा मृत्यू; शवविच्छेदनामधून समोर आली धक्कादायक माहिती

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संशोधकांनी करोना विषाणू आणि त्याचा लैंगिकतेवर होणारा परिणाम यासंदर्भातील संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने संशोधन केलं. या संशोधनामध्ये करोना विषाणूचा शरीरामध्ये शिरकाव झाल्यानंतर शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशी जलद गतीने मरण पावतात असं अभ्यासकांना दिसून आलं. त्याचबरोबर पेशींना सूज येणे आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससारखा परिणामही दिसून येतो. एखाद्या पेशीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचा वापर यामध्ये ताळमेळ न राहिल्यास पेशीच्या रचनेवर जो ताण पडतो त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात. करोनाचे विषाणू ज्यापद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर परिणाम करता त्याच पद्धतीने ते पुरुष बीजाण्डांवर (टेस्टिकल्सवर) परिणाम करतात असंही संशोधनामध्ये आढळलं.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

काय आहे संशोधकांचं म्हणणं?

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. जर्मनीमधील जस्टस-लीबिग-युनिव्हर्सिटीमधील बहेजाद हाजीजादेह मालेकी आणि बख्तियार टार्टिबियन हे दोन संशोधक प्रामुख्याने या विषयावर काम करत आहेत. या दोघांनाही दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दर दहा दिवसांनी करोनाची बाधा होऊन गेलेल्या ८४ पुरुषांची माहिती गोळा केली. या माहितीची तुलना त्यांनी १०५ सुदृढ पुरुषांच्या आरोग्यविषयक माहितीशी केली. या तुलनेमध्ये ज्या पुरुषांना करोनाचा संसर्ग झाला होता त्यांच्या शरीरामध्ये शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशींवर सूज येणे आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परिणाम अधिक असल्याचे दिसून आलं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास शिक्राणू निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टींमुळे रासायनिक बदल घडतात. याचा थेट परिणाम शुक्राणूच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या डीएनए रचनेवर आणि शरीरातील प्रथिनांवर होतो.

नक्की वाचा >> सेक्स कोणासोबत करणार हे २४ तास आधीच पोलिसांना सांगणं बंधनकारक; न्यायालयाकडून अजब निर्बंध

किती काळ राहतो हा परिणाम?

“ज्या पुरुषांचे शुक्राणू चांगल्या दर्जाचे नाहीत अशा पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता असते. शुक्राणूंच्या दर्जासंदर्भातील अडचण असेल तर कालांतराने शुक्राणू निर्मिती करणाऱ्या पेशींसंदर्भातील रासायनिक प्रक्रिया पुन्हा सामान्य होते. मात्र करोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या शुक्राणूंची निर्मिती सामान्यपणे होण्यासाठी अधिक काळ लागतो. जितक्या जास्त दिवस या आजाराचे परिणाम दिसता तितका गंभीर परिणाम होतो,” असं बहेजाद हाजीजादेह मालेकी यांनी सांगितलं. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर करोनाचा गंभीर परिणाम होतो असंही मालेकी यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच पुरुषांचे शुक्राणू हे करोनाचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या शारीरिक घटकांपैकी एक आहेत अशी अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली पाहिजे अशी मागणीही मालेकी यांनी केली आहे.

नक्की वाचा >> पोलिसांनी छापा मारला तेव्हा घरात ५० जण करत होते  Sex Party

एकीकडे संशोधकांनी हा दावा केला असला तरी दुसरीकडे या संशोधनामध्ये सहभागी नसलेल्या तज्ज्ञांनी या विषयासंदर्भात अधिक अभ्यासाची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 3:08 pm

Web Title: covid 19 infection could reduce fertility and sperm count in men finds study scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड
2 दिल्लीतील स्फोटामागे जैश उल हिंद; संघटनेनं घेतली जबाबदारी
3 ‘दीप सिद्धू विरोधात बोललीस तर’…प्रसिद्ध अभिनेत्रीला धमकी
Just Now!
X