01 October 2020

News Flash

डेव्हिड रॉकफेलर विमान अपघातात मृत्यमुखी

प्रसिद्ध मानवतावादी डेव्हिड रॉकफेलर यांचा वेचेस्टर परगण्यात झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. एका इंजिनाचे हे विमान होते. रिचर्ड (वय ६५) हे एकटेच पायपर पीए ४६-५००

| June 16, 2014 12:31 pm

प्रसिद्ध मानवतावादी डेव्हिड रॉकफेलर यांचा वेचेस्टर परगण्यात झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. एका इंजिनाचे हे विमान होते. रिचर्ड (वय ६५) हे एकटेच पायपर पीए ४६-५०० टीपी विमानात होते. व्हाईट प्लेन्स जवळील विमानतळावरून त्यांनी उड्डाण केले होते असे विमानतळ व्यवस्थापक पीटर शेरर यांनी सांगितले. नंतर विमान रडारवरून दिसेनासे झाले व एका खेडय़ात कोसळले, ते एका घरावर कोसळले असते, पण ते थोडक्यात दुसरीकडे पडले. स्टँडर्ड ऑईल फाऊंडर व मानवतावादी जॉन डी. रॉकफेलर यांचे ते पणतू आहेत. ते मैनेनजीक पोर्टलँडकडे जात असताना हा अपघात झाला. वडिलांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त ते निघाले होते. रिचर्ड हे अनुभवी वैमानिक होते, पण सकाळी धुक्याने दृश्यमानता कमी होती. अतिशय भयानक अशी ही घटना होती असे रॉकफेलर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:31 pm

Web Title: david rockefeller dies in plane crash
टॅग Plane Crash
Next Stories
1 संक्षिप्त :अधिकाऱ्याच्या हत्येवरून ममतांची विरोधकांवर टीका
2 चर्चा हवी असेल, तर हल्ले थांबवा – जेटली
3 दहशतवाद्यांकडून भारताच्या आर्थिक सुरक्षेला धोका- आयबी
Just Now!
X