डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. पंचकुलातील सीबीआय न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. हरयाणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब, हरयाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना छावणीचे स्वरुप आले आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पंचकुलात त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात ५ जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. त्यांना सेक्टर सहामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी न्यायालयात आज राम रहिम यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खबरदारी म्हणून पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. सिरसाजवळच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंचकुलात सीआरपीएफचे जवान तैनात आहेत. राम रहिम यांनी व्हिडिओ जारी करून समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असले तरी पंचकुलात  त्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र आले होते.

Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

Live update:

पंचकुलातील सेक्टर पाचमध्ये समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, १० जखमी

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हरयाणा, पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त

बलात्कार प्रकरणात राम रहिम दोषी, सोमवारी शिक्षा सुनावणार

सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू, थोड्याच वेळात निकाल देणार

न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी केली जाईल, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज: मुख्यमंत्री

हरयाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर यांचे ‘डेरा’ समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन

पंचकुलामध्ये कडेकोट बंदोबस्त, सीआरपीएफचे जवान न्यायालय परिसरात दाखल

गरज भासल्यास बळाचा वापर करा, चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करा: हायकोर्ट

राम रहिम यांच्या वाहन ताफ्यातील दोन वाहनांनाच पंचकुलात मिळणार प्रवेश

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांचे राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

पंचकुलातील सुरक्षेव्यवस्थेची लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पाहणी

राम रहिम यांच्या समर्थकांना अश्रू अनावर, अनेक समर्थक बेशुद्ध पडले

सुमारे शंभर वाहनांचा ताफा घेऊन राम रहिम पंचकुलाकडे रवाना

‘डेरा’ प्रमुख राम रहिम पंचकुलाकडे रस्तेमार्गाने रवाना

डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग दुपारी पावणे तीनच्या सुमारास न्यायालयात हजर होणार

पंजाब आणि हरयाणामध्ये कडेकोट बंदोबस्त