पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मालिकेतील पुढील भाग प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. मात्र रविवारी प्रसारित होणाऱ्या या भागांतून बिहारमधील मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही वक्तव्य त्यामध्ये असू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

सरकारने आयोगाशी संपर्क साधून २५ ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’चा पुढील भाग प्रसारित करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली. ती आयोगाने मान्य केली. सरकारने ‘मन की बात’साठी आयोगाशी संपर्क साधण्याची ही दुसरी वेळ आहे.
सप्टेंबर महिन्यांत मोदी यांनी मन की बातद्वारे जनतेशी संपर्क साधला मात्र त्यामध्ये आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळले नाही.