News Flash

मुलायमसिंह यांना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

| April 18, 2014 08:05 am

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. उत्तरप्रदेश शासनाकडून कंत्राटी पद्धतीवर नोकरीसाठी ठेवण्यात आलेल्या शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान करावे अन्यथा कामावरून त्यांची हकालपट्टी करण्याची धमकी मुलायमसिंह यांनी एका जाहीर सभेत दिली होती. त्यानंतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करताना निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना  स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुलायमसिंह यांना येत्या रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली. तसेच निवडणूक आचारसंहितेच्या काळात केंद्र किंवा राज्यसरकार आपल्या प्रचारासाठी सत्तेचा वापर करू शकत नाही याची आठवण निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2014 8:05 am

Web Title: ec notice to mulayam on prima facie poll code violation
Next Stories
1 निवडणूक काळात प्रचाराचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना कोटींचा नफा
2 खासगी कंपन्यांवरही ‘कॅग’ची देखरेख..
3 व्हिडिओ: रामदेवबाबांची भाजप उमेदवारासोबतची ‘आर्थिक’ चर्चा कॅमेरात कैद!
Just Now!
X