17 January 2021

News Flash

जम्मू-काश्मीर : बारामुल्लामध्ये इंटरनेट बंद, दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच

संपूर्ण बारामुल्ला जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद

(झज्जर कोटली येथे शोध मोहिम)

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. संपूर्ण बारामुल्ला जिल्ह्यामध्ये खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


 
बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी पहाटेपासूनच सुरक्षा रक्षकांनी परिसराची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आणि दहशतवाद्यांना घेरलं. सद्यस्थितीला किमान दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी घेरल्याची माहिती आहे.


यापूर्वी बुधवारी सकाळी जम्मू-श्रीनगर महामार्गाजवळ झज्जर कोटली येथे दहशतवाद्यांनी वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला होता. कालपासून या जंगल परिसरातही सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरू असून जंगलात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 9:53 am

Web Title: encounter in sopore of baramula between security forces and terrorists internet suspended
Next Stories
1 तेलंगणा बस अपघातातील चालकाला गेल्या महिन्यात मिळाला होता ‘बेस्ट ड्रायव्हर’ पुरस्कार
2 भारत आणि चीनला बुलेट ट्रेनने जोडण्याचा विचार!
3 इंधन दरवाढीचं विघ्न कायम, आज पुन्हा भाव वाढले
Just Now!
X