28 September 2020

News Flash

टेरर फंडिंग प्रकरणात काश्मीरमधून आमदार राशिद इंजिनिअरला NIA कडून अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक केली आहे.

दहशतवादाला निधी उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक केली आहे. काश्मीर खोऱ्यात मोठया प्रमाणावर निर्बंध लागू आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर मागच्या चार दिवसांमध्ये खबरदारी म्हणून काश्मीर खोऱ्यातून ८०० पेक्षा जास्त राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवादाला निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रकरणात मागच्या आठवडयाभरापासून राशिदची एनआयएकडून चौकशी सुरु होती. काश्मीर खोऱ्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानातून पैसा मिळत असल्याचे आरोप असून या प्रकरणी एनआयएकडून चौकशी सुरु आहे. राशिद इंजिनिअरने झाहूर वाताली बरोबर व्यवहार केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत.

काश्मीरमधील अन्य फुटीरतवाद्यांसोबतही त्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत असे वरिष्ठ एनआयए अधिकाऱ्याने सांगितले. टेरर फंडिंगच्या प्रकरणात पाकिस्तान आणि काश्मिरी फुटीरतवाद्यांमध्ये झाहूर वातालीची महत्वाची भूमिका होती. पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाकडून त्याला पैसे मिळाल्याचा आरोप आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून खबरदारी म्हणून अनेक राजकीय नेते, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त असून संचारबंदी लागू आहे. फोन आणि इंटरनेट सेवा बंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 10:46 am

Web Title: engineer rashid arrested in terror funding case dmp 82
Next Stories
1 काँग्रेसला आज मिळणार अध्यक्ष; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव शर्यतीत
2 काश्मीर प्रश्नावर तालिबाननेही पाकिस्तानला दिला झटका
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X