15 August 2020

News Flash

फेसबुकने जारी केले मेसेंजर अ‍ॅप

फेसबुकने आज अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व

| December 6, 2012 05:22 am

फेसबुकने आज अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व ग्रहण करू शकतील.
फेसबुक या सोशल नेटवर्किंगमधील अग्रेसर कंपनीने त्यासाठी इतर कंपन्यांशी भागीदारी केली आहे. आता वापरकर्ते मेसेंजर अकाऊंटवर केवळ नाव व फोन नंबर देऊन साइनअप करू शकतील. त्यानंतर त्यांना फेसबुकवरून त्यांच्या फोनवर असलेल्या संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवता येईल असे फेसबुकने म्हटले आहे.
अँड्रॉइडवर ही सेवा मेसेंजरवर पहिल्यांदा भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, व्हेनेझुएला व दक्षिण आफ्रिका या देशात सुरू केली जात असून इतर देशांतही ती नंतर सुरू होणार आहे. नवीन मेसेंजरचा अनुभव चांगला असावा व त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हे नवीन उपयोजन सुरू केले असून, त्यात तुमच्या फोनमधील संपर्कयादीत असलेल्या कुणालाही फेसबुकवरून संदेश पाठवता येणार आहे. केवळ फेसबुकवर असलेल्यांनाच नव्हेतर इतरांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
मेसेंजर हे एकमेव मोबाईल उपयोजन (अ‍ॅप) असून ते मोफत डाऊनलोड करता येईल, त्यात ग्राहकांच्या सध्याच्या डेटा प्लानचा वापर केला जाईल. ज्यांनी हे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केलेले नाही त्यांना कुणीही पाठवलेले संदेश फेसबुकवर लॉगइन केल्यावर बघता येतील. अँड्रॉइडसाठी मेसेंजर अ‍ॅप आज उपलब्ध करण्यात आले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2012 5:22 am

Web Title: facebook published new messages apps
टॅग Facebook
Next Stories
1 ‘एफडीआय’ लढाई लोकसभेत यूपीएने जिंकली!
2 एफडीआयच्या मुद्यावर बसपाचा यूपीएला पाठिंबा; सपाची माघार
3 बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये गोंधळ
Just Now!
X