सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलींशी बोलायचीही भीती वाटते. स्वीय सचिव म्हणून महिलेला घ्यायला नको असे वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री फारख अब्दुल्ला वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांच्या विरोधात निषेधाचा वाढता सूर पाहता अब्दुल्लांनी माफी मागितली.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्य़ात मोठय़ा व्यक्तींचे सहभाग असल्याचे उघड झाल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना लैंगिक शोषणाची तक्रार झाल्यास एखाद्याला तुरुंगात जावे लागते. अब्दुल्लांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.