News Flash

सॅनिटायझर्सवर का लागतो १८ टक्के जीएसटी?; अर्थखात्यानं दिलं हे कारण

सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तुंवरही १८ टक्के जीएसटी

हॅण्ड सॅनिटायझरवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अर्थमंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

करोनामुळे देशातील सॅनिटायझरच्या वापरात वाढ झालेली असून, त्यावरील जीएसटीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.  सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असून, तो कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावर केंद्रीय अर्थ मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर हात धुणे वा सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून सातत्यानं दिल्या जात आहे. हातांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर फायदेशीर असल्यान त्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली. मात्र, सॅनिटायझरवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीवरून केंद्र सरकारकडे नवी मागणी केली जात आहे.

या मागणीवर केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. सॅनिटायझरसह अॅण्टी बॅक्टेरियल लिक्विडस, डेटॉल इत्यादींवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल. त्याचबरोबर हॅण्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स, पॅकिंग मटेरिअल्स आणि इतर सेवांवरही १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल. सॅनिटायझर व याच प्रकारच्या इतर वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास त्यामुळे स्थानिक उत्पादकांना नुकसान सोसावं लागेल. जीएसटीच्या कमी दरामुळे आयातीलाच मदत होईल, जे की आत्मनिर्भर भारत अभियान या धोरणाच्या विरोधी आहे, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

हॅण्ड सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तुंच्या श्रेणीत येत असल्यानं जीएसटीतून वगळण्यात यावं अथवा त्यांच्या जीएसटी कमी करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. सातत्यानं उपस्थित केल्या जात असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरील मागणीवर अर्थ मंत्रालयानं अखेर भूमिका मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 6:09 pm

Web Title: finance ministry clerification about gst on hand sanitazers bmh 90
Next Stories
1 जे ठरलंय, त्याचं पालन करा, १५ तासाच्या मॅरेथॉन बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट संदेश
2 सचिन पायलट यांना काँग्रेसचं आवाहन; “…तर भाजपा सरकारच्या आदरातिथ्याला तातडीनं नकार द्या”
3 आंबटशौकीनाला तिने व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरुन घातला हजारोंचा गंडा
Just Now!
X