मायक्रोसॉफ्टने तब्बल चार वर्षानंतर एन्टरटेनमेंट कन्सोल निर्मिती क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करत, ‘एक्स-बॉक्स वन एन्टरटेनमेंट कन्सोल’ चे अनावरण केले. या एक्स बॉक्सचे वैशिष्ट म्हणजे यात गेम्स खेळण्यासोबत टेलिव्हीजनही पाहता येईल. त्याचबरोबर या एक्स बॉक्सला शाब्दीक सुचना(व्हॉईस कमांड) देऊन टेलिव्हीजन चॅनेल्स बदलण्याची सुविधा आहे. ‘एक्स-बॉक्स वन’ची किंमत अद्याप मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेली नाही. येत्या वर्षभरात एक्स-बॉक्स बाजारात उपलब्ध होईल. मायक्रोसॉफ्टने एका इव्हेंटच्या माध्यमातून केवळ याची पहिली चाचणी केली. तसेच या एक्स-बॉक्समध्ये काही नवे बदल होण्याचीही शक्यता आहे. पण, मायक्रोसॉफ्टच्या ग्राहकांची मागील ‘एक्स-बॉक्स ३६०’ मधील गेम्सही या ‘एक्स-बॉक्स वन’ मध्ये समाविष्ट करावेत ही मागणी ‘एक्स-बॉक्स वन’च्या माध्यमातून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या उपकरणात अद्यापही काही बदल होण्याची शक्यता आहे. या उपकरणाबद्दलची सविस्तर माहिती लॉस एंजेल्स येथे पुढील महिन्यात होणा-या ‘ई-३ व्हिडीओ गेम’ परिषेदत मिळण्याची शक्यता आहे.