15 October 2019

News Flash

फिटनेसचे धडे देताना चुकीचा स्पर्श, ट्रेनर विरोधात महिलेची तक्रार

खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने फिटनेस ट्रेनरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने फिटनेस ट्रेनरवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवयात स्टार्टअप मोबाइल अॅप्लिकेशनमधून फिटनेस ट्रेनिंग सेशन बुक केले होते असे महिलेने पोलिसांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तक्रारदार महिला कासूवानाहाल्ली येथे रहायला आहे. तिने बुक केलेल्या सेशननुसार ट्रेनर गोपाळ कृष्णा शेट्टीने तिच्या घरी जाऊन ट्रेनिंग सुरु केले. फिटनेस प्रशिक्षणादरम्यान ट्रेनरने आपल्यासोबत गैरवर्तणूक सुरु केली तसेच तो आपल्याला लैंगिक त्रास देत होता असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

ट्रेनिंग दरम्यान तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायता. त्याचे वाईट इरादे स्पष्ट झाले होते. त्याशिवाय तो घरात फिरायचा. कपाट उघडून परवानगीशिवाय कुठल्याही वस्तू उचलायचा असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी कलम ३५४ अ अंतर्गत शेट्टी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on May 21, 2019 6:06 pm

Web Title: fitness trainer booked for sexual harassment