17 November 2017

News Flash

उत्तर प्रदेशात जातीय दंग्यात पाच जण जखमी

मुझफ्फरनगरमध्ये सवर्ण आणि दलित गटामध्ये दगडफेक

मुझफ्फरनगर | Updated: July 17, 2017 8:03 PM

Muzaffarnagar: जातीय दंगलीदरम्यान पडलेला वीटांच्या तुकड्यांचा खच.

दोन गटांतील भांडणामुळे येथे अचानक उसळलेल्या जातीय दंग्यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. दुखड गावात आज हा प्रकार घडल्याचे वृत्त फायनान्शिअल एक्सप्रेसने दिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय नामक एक सवर्ण समाजातील तरुण कामानिमित्त दलितांच्या वस्तीत गेला होता. दरम्यान, काही कारणामुळे त्याची तेथील काही जणांसोबत बाचाबाची झाली. काही वेळातच ते हाणामारीवर उतरले. त्यानंतर दोन्ही बाजूचे अनेक लोक यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी एकमेकांवर वीटांच्या तुकड्यांचा वर्षाव सुरु केला. या दगडफेकीत संजय, योगेंदर, विकास, मॉन्टी आणि सचिन हे ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खगोलिया पोलिस स्थानकांत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुखड गावात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

First Published on July 17, 2017 7:52 pm

Web Title: five people injured at uttar pradesh communal violence