अंधश्रद्धेच्या विळख्यातून देशाची सुटका कधी होणार? हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येण्याचे मुख्य कारण म्हणजे मथुरा येथे घडलेली घटना. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मांत्रिकाच्या सांगण्यावरून चार जणांनी एका १९ वर्षांच्या मुलाचा बळी दिला आहे. पोलिसांनी असा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाला आणि तरूणाचा बळी देणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

सचिन नावाचा एक रिक्षा चालक बेपत्ता झाला, ज्याची शोधाशोध सुरू झाली. पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी विनोद साइनी आणि राजेंद्र यादव या दोघांना अटक केली. कारण ते सीसीटीव्हीत दिसले होते. सचिन बेपत्ता होण्याआधी हे दोघे त्याच्यासोबत दिले होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी सुरु केली. ज्यानंतर विनोद आणि राजेंद्र यांनी आपल्यासोबत आणखी दोघे होते असे सांगितले. या चौघांनी सचिनचे अपहरण केले आणि तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याला ठार केले असी माहिती समोर आले आहे. तरूणाचा बळी दिला तर तुम्ही लखपती व्हाल असे तांत्रिकाने सांगितले होते म्हणून आम्ही हा बळी दिला. अशी कबुली या चौघांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिेले.

या चौघांविरोधात कलम ३०२ आणि कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अजूनही चौकशी सुरू असल्याचे सरदार पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. विनोद आणि राजेंद्र यांनी रिक्षा बोलावली. ही रिक्षा सचिन चालवत होता. ते दोघेही सचिनला महादेव घाट या ठिकाणी येऊन गेले. तिथे त्याचा बळी देण्यात आला एका केबलने गळा आवळून सचिनची हत्या करण्यात आली. मांत्रिकाच्या आहारी जाऊन लक्षाधीश होण्याच्या खोट्या मोहाला चारजण बळी पडले आणि लक्षाधीश झाले नाहीत तर थेट तुरुंगात येऊन पोहचले आहेत.