प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २०० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतेलेल्या विमानाने पेट घेतला होता. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेच वैमानिकांना हे सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गो-एअर एअरलाइन्सचे दिल्ली – बंगळुरू या विमानासोबत हा प्रकार घडला.  या विमानात एकूण २०० प्रवासी होते त्यापैकी  एक प्रवासी सौरभ टंडन यांनी इंडियन एक्सप्रेसला आपला अनुभव सांगितला.

go-air-ticket-759

दिल्ली-बंगळुरू या विमानाने बुधवारी  सायंकाळी ६.४० ला उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्याच्या ५-७ मिनिटांनी आग-आग असा आवाज ऐकू आला. मी माझ्या डाव्या बाजूला पाहिले तर इंजिनला आग लागलेली दिसली. ही आग प्रचंड मोठी होती. आतमध्ये बसलेले प्रवासी यामुळे घाबरुन गेले. विमान किमान ५,००० ते ६,००० फूट उंचीवर होते. ही आग किमान ३० सेकंद चालली असेल त्यानंतर आग थांबली. पुढील २०-३० मिनिटांमध्ये वैमानिकाने विमान खाली उतरवले. खाली उतरल्यानंतर आम्हाला विमानातून खाली उतरलो. त्यानंतर पुढील २० मिनिटांमध्ये दुसऱ्या विमानाने आम्ही बंगळुरूला निघालो असे ते टंडन यांनी सांगितले.

काही प्रवासी या धक्क्यातून सावरले नव्हते. त्यांना पुन्हा विमानामध्ये बसण्याचीदेखील भीती वाटू लागली होती. आम्ही जेव्हा विमानातून उतरलो त्यानंतर विमानाची दुरुस्ती करण्यात येऊ लागली होती.
ही विमानात झालेली एक छोटीशी तांत्रिक बिघाड होती पंरतु त्यामुळे आमचे प्राण जातात की काय असे काही क्षणांसाठी वाटले होते असे टंडन यांनी म्हटले.