News Flash

खूशखबर: केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटनंतर मिळू शकते वेतनवाढीचे गिफ्ट

सातव्या वेतन आयोगानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचे गिफ्ट मिळू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

सातव्या वेतन आयोगानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचे गिफ्ट मिळू शकते. केंद्र सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करु शकते. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सरकारच्या या घोषणेनंतर डीए १७ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर पोहोचणार आहे. केंद्र सरकार या वर्षी मार्च महिन्यात याची घोषणा करु शकते. माध्यमातील वृत्तांनुसार, श्रेणी-१ च्या कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यास पगारात कमीत कमी ७२० रुपयांपासून जास्तीत जास्त १०,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५,००० रुपयांपासून २१,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

जानेवारी २०१९ मध्ये केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए ३ टक्के वाढवला होता. यापूर्वी गुजरात सरकारने आपल्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ५ टक्के वाढवला होता.

दरम्यान, १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत वार्षिक अर्थसंकल्प मांडणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 8:20 pm

Web Title: good news central govt employees likely to get pay hike after budget 2020 aau 85
टॅग : Budget 2020
Next Stories
1 ‘चाय पे चर्चा’ घ्या, आमची ‘मन की बात’ ऐका; शाहीन बागच्या महिला आंदोलकांचे मोदींना आवाहन
2 Video : भाजपाच्या रॅलीत आंदोलकांनी ओढले महिला उपजिल्हाधिकारीचे केस
3 भारतात CAA ची गरजच नव्हती, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची वादात उडी
Just Now!
X