News Flash

प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं निधन , एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

१९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं

(गोपालदास निरज, फोटो - इंडियन एक्सप्रेस)

हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं गुरूवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गुरूवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती खालावल्याने गोपालदास नीरज यांना आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने बुधवारी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर गुरूवारी त्यांचं निधन झालं. ४ जानेवारी १९२५ रोजी जन्मलेल्या निरज यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली. १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना तीन वेळेस फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं.

निरज यांच्या पार्थिवाला आग्रा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल, तेथून त्यांचं पार्थिव अलीगडमध्ये नेण्यात येईल आणि तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती त्यांचा मुलगा शशांक प्रभाकरने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:26 am

Web Title: gopaldas neeraj passes away at the age of 93
Next Stories
1 संसदेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा कट?
2 सभापती संतापल्या!
3 जमाव मारहाणीविरोधात राज्यांनी प्रभावी कारवाई करावी
Just Now!
X