News Flash

तेलंगणासंदर्भात डेडलाईन ठरविता येणार नाही : शिंदे

वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसंदर्भात कोणतीही अंतिम तारीख ठरविण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

| January 30, 2013 02:48 am

वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसंदर्भात कोणतीही अंतिम तारीख (डेडलाईन) ठरविण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीसंदर्भात कोणती अंतिम तारीख ठरली आहे का, असे विचारल्यावर शिंदे यांनी यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
तेलंगणासंदर्भात गेल्या रविवारी केंद्र सरकार निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, अजून विचारविनिमय आवश्यक असल्याचे सांगत सरकारने निर्णय पुढे ढकलला.
तेलंगणासंदर्भात महिन्याभरात निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी गेल्या महिन्यात २८ तारखेला जाहीर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 2:48 am

Web Title: government refuses to give fresh deadline on telangana
Next Stories
1 तेलंगणप्रश्नी शिंदे, चिदम्बरम यांच्यावर फसवणुकीचा आरोप
2 येडियुरप्पा समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याची भाजप आमदारांची मागणी
3 नासाच्या बलूनचा विक्रम
Just Now!
X