26 February 2021

News Flash

इराणमध्ये आरोपीला भरचौकात फासावर लटकावले

या वेळी नागरिकांनी जल्लाेष केला

इराणमध्ये एका सातवर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला बुधवारी सार्वजनिकरीत्या फासावर लटकावण्यात आले. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे आरोपीला अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या वेळी नागरिकांनी जल्लाेष केला.  इस्माईल जफरजादेह (वय ४२) असे आरोपीचे नाव असून, त्याला अर्देबिल प्रांतातील परसाबाद शहरातील चौकात ही शिक्षा देण्यात आली. याप्रसंगी परिसरातील अनेक लोक उपस्थित होते. या घटनेचा अनेकांनी निषेधही केला होता. पीडित बालिका ही १९ जून रोजी तिच्या वडिलांसोबत बेपत्ता झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 9:30 pm

Web Title: hangs the accused on open street in iran
Next Stories
1 माझा गळा कापा, पण मला माझे काम शिकवू नका; हायकोर्टावर ममतादिदी बरसल्या
2 बेनझीर यांच्या हत्याप्रकरणात झरदारींचा सहभाग, मुशर्रफ यांचा खळबळजनक आरोप
3 यस बँकेकडून २५०० कर्मचाऱ्यांची कपात
Just Now!
X