News Flash

मोठी बातमी! अमित शाह यांना करोनाची लागण

अमित शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु

संग्रहित (PTI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”.

करोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना करोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु असून लॉकडाउनही ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:54 pm

Web Title: home minister amit shah tests corona positive sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ड्रोन, शहरात प्रवेशबंदी, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई; अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
2 “लोकशाहीला तडा गेलाय”, राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम
Just Now!
X