* अटक होण्याची शक्यता
मोहालीतील हेरॉइन तस्करी प्रकरणी बीजिंग ऑलिपिंकमधील ब्रॉंझपदक विजेता मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याच्या विरोधात चंदीगड पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याचे समजते. या प्रकरणात ३ मार्च रोजी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी अनुपसिंग काहलोन याच्या विजेंदरसिंग सतत संपर्कात होता. त्यामुळे त्याला केव्हाही अटक होऊ शकते. यानंतर झालेल्या तपासणी दरम्यान काहलोनचा सहचारी रॉकीला सुद्धा अटक करण्यात आली. काहलोन याच्या मोहालीतील झिराकपूरमधील घरातून ७ मार्च रोजी पोलिसांनी १३० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले होते. विजेंदर हा हरियाना पोलिस दलात उपअधीक्षक पदावर नियुक्तीस आहे. अमली पदार्थ सेवन प्रकरणी राम सिंग याला पंजाब पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. राम सिंग हा विजेंद्रसिंग याचा एनआयएस पतियाळा मधील खोलीमित्र होता. त्यामुळे विजेंद्रसिंगवरील संशय आणखिन बळावला गेला आहे.