मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील अधिक माहिती मिळविण्यासाठी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा डेव्हीड हेडली याला तात्पुरते, वर्षभरासाठी तरी भारताच्या ताब्यात द्यावे अशी मागणी भारताने अमेरिकेकडे केल्याचे सुत्रांनी सांगितले. हेडलीबरोबर त्याचा या प्रकरणातील साथीदार तहव्वूर हुसैन राणा याचेही हस्तांतरण करण्यात यावे, अशी मागणी भारताने केली आहे.  २० ते २२ मे दरम्यान, भारत व अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ही मागणी करण्यात आली.
“भारताच्या या मागणीचा अमेरिका सकारात्मकदृष्ट्या विचार करेल” असे आश्वासन अमेरिकेने दिल्याचे या बैठकीत सहभागी झालेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.