News Flash

भारताला मिळणार ‘राफेल’ बळ; राजनाथ सिंह शस्त्रपूजन करणार

भारताला मिळणाऱ्या राफेलमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.

फोटो सौजन्य- ANI

आज (मंगळवार) विजयादशमीच्या दिनी भारताला पहिलं राफेल मिळणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे फ्रान्सला पोहोचले आहेत. दरम्यान, आज पहिले राफेल जेट भारताला सुपूर्द करण्यात येईल. दसऱ्यानिमित्त राजनाथ सिंग हे शस्त्रपूजनदेखील करणार आहेत.

राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसंच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यतात आले आहेत. दरम्यान, हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. राफेलसाठी सर्वच उत्साही आहेत. राफेल भारतात येणार असून ते 8 ऑक्टोबरला भारताला सोपवण्यात येणार आहे, असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. फ्रान्स भारताला 36 राफेल विमानं देणार आहे.

राफेल विमानात हे सहा बदल होणार
इस्रायली हेल्मेटट माऊंटेड डिस्प्ले
रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
लो बॅण्ड जॅमर्स
10 तासांचा फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
इन्फ्रा-रेड सर्च
ट्रॅकिंग सिस्टम

राफेल विमानाची वैशिष्ट्ये
1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.
2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:59 pm

Web Title: india to get first rafale jet today defence minister rajnath singh in france jud 87
Next Stories
1 छत्तीसगड : दंतेवाडातील चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा
2 ”दुर्गापूजा करणे हा तर इस्लामचा अपमान”; नुसरत जहाँवर धर्मगुरू संतापले
3 भारतीय हद्दीत पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन; BSF ला सतर्कतेचा इशारा
Just Now!
X