मागील ५ महिन्यांच्या विचार करता जून महिन्यात महागाई सर्वात जास्त प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या वर गेला. मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के होता. इंधन दरवाढीमुळे ही महागाई वाढल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. आरबीआयने महागाईबाबतच जो अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा हा दर जास्त आहे. आरबीआयने महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र जून महिन्यात हा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्थव्यवस्थेसाठी या वर्षातली चिंतेची बाब ठरली आहे ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रातले उत्पादन घटणे ही होय. मे महिन्यात औद्योगिक उत्पादनाचे प्रमाण ३.२ टक्के होते. तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण ४.९ टक्के होते. इंडस्ट्रियल प्रॉडक्शनमद्ये स्लोडाऊन कोअर सेक्टर इंडस्ट्रीज च्या प्रगतीत कमकुवतता दाखवणारा आहे. कोअर सेक्टर इंडस्ट्रीजची वाढ मे महिन्यात ३.६ टक्के होती.तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण ४.६ टक्के होते.

इंडस्ट्रियल प्रॉडक्शन इंडेक्समध्ये ४०.२७ टक्के वाटा हा ८ इन्फ्रास्टक्चर सेक्टरचा असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये कोळसा, कच्चे तेल, नॅचरल गॅस, रिफाइनरी उत्पादने, फर्टिलाइजर्स, स्टिल, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी विभागांचा समावेश आहे. या भागाची वाढ मे महिन्यात २.८ टक्के इतकीच झाली तर एप्रिलमध्ये हे प्रमाण ५.२ टक्के इतके होते.