News Flash

इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानकडे वळवला मोर्चा, भारताला धोका

इसिसचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी मारला गेल्यानंतर इस्लामिक स्टेट आता अफगाणिस्तानमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत इसिसचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी मारला गेल्यानंतर इस्लामिक स्टेट आता अफगाणिस्तानमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली तर त्यापासून भारत, पाकिस्तान, रशिया आणि चीनला धोका आहे असे इराणचे परराष्ट्र मंत्री जावद झरीफ म्हणाले. इसिसमुळे उदभवणाऱ्या नव्या संकटाचा सामना करण्यासाठी या सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे झरीफ यांनी सांगितले.

“इसिसचे पुनर्जीवन भारत, इराण आणि पाकिस्तान तिघांसाठी चिंतेचा विषय आहे. सीरिया आणि इराकमध्ये पाडाव झाल्यामुळे इसिस आता आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवत आहे. अफगाणिस्तानातील एका ठराविक भूप्रदेशातून इसिसच्या कारवाया सुरु आहेत. प्रत्येकासाठी हा चिंतेचा विषय आहे. यामुळे कुठल्या एका देशाला नव्हे संपूर्ण प्रदेशाला धोका आहे” असे जावेद झारीफ म्हणाले.

अफगाणिस्तानातील तळावरुन इसिसचे दहशतवादी तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये कारवाया करत असल्याची माहिती उपलब्ध आहे असे झारीफ यांनी सांगितले. इसिसबद्दल गुप्तचरांकडून मिळालेली ही माहिती गंभीर बाब आहे. आम्ही याबद्दल भारत, पाकिस्तान, रशिया आणि चीनच्या संपर्कात आहोत. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत आपण सर्व एकत्र येऊ शकतो असे झारीफ म्हणाले. अमेरिकेच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “अमेरिका आपल्या मदतीसाठी येणार नाही. आपल्यालाच आपली मदत करावी लागेल”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 5:52 pm

Web Title: islamic state is relocating to afghanistan its threat for india too dmp 82
Next Stories
1 ममता बॅनर्जींचे राज्यपाल कोश्यारींवर टीकास्त्र; पहा काय म्हणाल्या…
2 बंद खोलीत झालेली चर्चा सार्वजनिक करणं माझ्या पक्षाचे संस्कार नाहीत- अमित शाह
3 भारताची शान वाढवणाऱ्या गणितज्ञांची मृत्यूनंतर अवहेलना
Just Now!
X